हेरले सोसायटीत सत्ताधाऱ्यांची बाजी

हेरले सोसायटीत सत्ताधाऱ्यांची बाजी

03154
हेरले : माजी सभापती राजेश पाटील व कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
---------

हेरले सोसायटीत सत्ताधाऱ्यांची बाजी
राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सर्व जागांवर विजयी
हातकणंगले, ता. २७ ः हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत माजी सभापती राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आघाडीने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्रस्थापीत केले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
राजेश पाटील म्हणाले, ‘पाच वर्षामध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभार केल्यामुळे सभासदांनी सर्वच १३ जागांवर विजयी करून दुसऱ्यांदा संस्थेची सत्ता आमच्या आघाडीकडे दिली आहे. पुढील काळातही निश्चीतच सभासदांच्या आणखीन हिताचे निर्णय घेतले जातील.’ हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या १३ जागांसाठी दुरंगी लढत झाली. ६२५ सभासदांपैकी ६१२ जणांनी मतदान केले. जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. दोन्ही आघाड्यांनी अर्ज दाखल केल्यापासूनच प्रचारास सुरुवात केली होती. यामुळे निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद ओतारी, नितीन माने, उदय उलपे होते. सचिव नंदकुमार माने, रवी मिरजे, अमित नाईक, अक्षय इंगळे यांचे सहकार्य लाभले.
---------
विजयी उमेदवार ः राजेश पाटील, उदय चौगुले, कपिल भोसले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, अशोक मुंडे, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com