मुख्याधिकाऱ्यांना नोटीस..

मुख्याधिकाऱ्यांना नोटीस..

हातकणंगले मुख्याधिकाऱ्यांना
जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस

व्यायामशाळा साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचाराची नगरसेविकेची तक्रार

हातकणंगले, ता. १९ः हातकणंगले नगरपंचायत प्रभाग क्र.चार मधील व्यायामशाळा व खेळणी साहित्य खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत नगरसेविका रोहिणी खोत यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने प्राप्त अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत याबाबत योग्य खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या नोटिशीत म्हटले आहे की, नगरसेविका रोहिणी खोत यांनी प्रभाग चारमधील व्यायामशाळा साहित्य व खेळणी साहित्य खरेदीमधील भष्टाचाराची चौकशी होण्याबाबत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या अर्जाच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन शाखेचा अहवाल व इतर दस्तऐवजांची तपासणी केली असता या निविदा प्रक्रियेमध्ये कायदे, नियम, शासन निर्णय यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून येत आहे.
तसेच नगरसेविका खोत यांना शाहूनगर येथे बिलातील काही वस्तू आढळून आल्या नाहीत. याबाबत प्रभागातील संबंधित नगरसेवक यांनी ठेकेदाराकडे संबंधित साहित्य नसल्याने त्या बदल्यांत दुसरी खेळणी देणार आहोत, असे सांगितले; परंतु सर्व साहित्याचे बिल २६ डिसेंबर २०२२ लाच ठेकेदाराला आदा केल्याची तक्रार आहे. बिलामधील ठराविकच साहित्य बसवले असताना मुख्याधिकाऱ्यांनी सर्व साहित्याचे बिल ठेकेदाराला आदा केलेले आहे. ही बाब नियमांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे याप्रकरणी आपण नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून येत आहे. ही बाब गंभीर असून, याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह व परिपूर्ण कागदपत्रांसह खुलासा सात दिवसांत समक्ष सादर करावा अन्यथा आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com