हातकणंगलेच्या मैदानात माऊली जमदाडे विजेता

हातकणंगलेच्या मैदानात माऊली जमदाडे विजेता

03188
हातकणंगले ः माऊली जमदाडेचा सत्कारप्रसंगी अरूण कुमार जानवेकर, संदिप कारंडे, दिपक वाडकर, अमृतमामा भोसले आदी उपस्थित होते.
-------
हातकणंगलेच्या मैदानात माऊली जमदाडे विजेता
एक लाख २१ हजाराचा मानकरी; साठहून अधिक कुस्त्यांचे आयोजन
हातकणंगले, ता. २३ ः एकेरी पट काढून डंकी डावावर छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल, पारनेरचा योगेश पवारला केवळ सात मिनिटात अस्मान दाखवत महान भारत केसरी गंगावेस तालमीचा माऊली जमदाडेने हातकणंगलेतील कुस्ती मैदान मारले. माऊलीला प्रथम क्रमांकाचे एक लाख एकवीस हजाराचे रोख पारितोषिक देऊन गौरवले. भागवत निरगुडे (पुणे) याला हप्ता डावावर पराभूत करत श्रीमंत भोसले (व्यंकोबा मैदान, इचलकरंजी) याने दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. त्याला ७५ हजाराचे रोख पारितोषिक दिले.
येथील श्रीराम एज्युकेशनल, स्पोर्ट्स, अँग्रो फाउंडेशनतर्फे कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यताने कुस्ती मैदान आयोजित केले होते. मैदानांत साठहून अधिक कुस्त्या लावण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना सुमारे पाच लाखांची बक्षिसे दिली. विजेत्यांना हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, संदीप कारंडे, युवा उद्योजक विश्वजीत सुदेश मोरे, खजिनदार म. रा. वरिष्ठ कुस्तीगीर परिषदेचे अमृतमामा भोसले, अशोकराव माने, दीपक वाडकर, रावसाहेब कारंडे, संदीप कांबळे, अतुल मंडपे, नगरसेवक मयुर कोळी, नगरसेवक दिनानाथ मोरे आदींच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला. फौंडेशनचे अध्यक्ष शैलेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष अक्षय कदम, सेक्रेटरी पंकज यादव, सहसेक्रेटरी कृष्णा जाधव, खजिनदार अमोल चव्हाण, विश्वस्त सचिन जाधव, विनायक मोरे, अरुण परीट, मिथुन जाधव, मधुर चौगुले, चंद्रकांत जाधव, सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com