विकासाची गंगा घरोघरी पोहोचवुया

विकासाची गंगा घरोघरी पोहोचवुया

03207
हातकणंगले ः शासकिय योजनांची जत्रा बैठकीस उपस्थित खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, अधिकारी आदी.
----------
विकासाची गंगा घरोघरी पोहोचवुया
खासदार धैर्यशील माने; हातकणंगलेत शासकीय योजनांची जत्रा उपक्रम
हातकणंगले, ता. ५ ः शासनाने प्रत्येकासाठी कोणती ना कोणती योजना तयार केली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारी ओळखून काम केले तर कोणीही या योजनांपासून वंचित राहणार नाही. राज्य शासनाच्या शासकीय योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत कोणत्याही लाभार्थीचा अर्ज अपुऱ्या कागदांच्या कारणास्तव निकालात निघणार नाही याची काळजी शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हातात हात घालून काम करत जनहितकारी योजनेच्या माध्यमातून विकासाची गंगा घरोघरी पोहोचवुया, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
येथील शासकीय इमारतीमध्ये आयोजित राज्य शासनाच्या शासकीय योजनांची जत्रा उपक्रमांतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. महसुल, कृषी, आरोग्य, वीज महामंडळ, महापालिका, नगरपंचायत यासह विविध विभागातील प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.
कागदपत्राची पूर्तता करून लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्याची जबाबदारी तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिकारी यांची असून हातकणंगले तालुक्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कमी पडणार नाही, अशी ग्वाही प्रांताधिकारी मोसमी बर्डे -चौगुले यांनी दिली. तहसिलदार कल्पना ढवळे यांनी स्वागत करून महसूल विभागाकडे बावीस योजना असून त्या पूर्ण करण्यासाठी अॅक्शन प्लॅन केल्याचे सांगितले. आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, अरुणकुमार जानवेकर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, रविंद्र माने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com