
हातकणंगलेत सोमवारी बैलगाडी शर्यत
हातकणंगलेत सोमवारी बैलगाडी शर्यत
हातकणंगले, ता. १९ ः येथे सोमवारी (ता. २२) छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सकाळी नऊला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाच्या माळावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. विजेत्यांना एकूण सव्वा लाखांची रोख बक्षिसे देण्यात येतील. खासदार धैर्यशील माने व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शर्यतीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेड हातकणंगलेचे अध्यक्ष दीनानाथ मोरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश जाधव व दीपक कुनुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रथम ३१ हजार, द्वितीय २१ हजार आणि तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे सांगण्यात आले. यात जनरल बैलगाडी अ गट, जनरल बैलगाडी ब गट, बैलगाडी जनरल गट आणि दुसा व चौसा जनरल गाडी गट अशा प्रकारात शर्यतीचे विभाजन केले आहे. आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, अशोकराव माने, सुदेश मोरे, नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, सुभाष मोरे आदी उपस्थित राहतील. शासकीय नियम पाळून व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.