
दिवसाला पाच रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट
03236
हातकणंगले ः पी एम वाणी वायफाय योजनेच्या प्रारंभप्रसंगी खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.
----------
दिवसाला पाच रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट
खासदार धनंजय महाडीक; हातकणंगलेत ‘पी एम वाणी’चा प्रारंभ
हातकणंगले, ता. २६ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब जनतेला स्वस्तात इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सरकारमान्य इंटरनेट सेवा ही योजना सुरू केली असून दिवसाला पाच रुपयांमध्ये अनलिमिटेड मोबाईल डाटा उपलब्ध होणार आहे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
ते हातकणंगले येथे जिल्ह्यातील पहिल्या पी एम वाणी वायफाय योजनेच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. खासदार महाडिक यांच्याहस्ते प्रारंभ केला. खासदार महाडिक म्हणाले, ‘पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वायफायमध्ये मोठी क्रांती होईल. ज्यामध्ये लोकांना व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना फायदेशीर ठरणारी ही योजना असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा.’
अरुण इंगवले, रेशन धान्य दुकान जिल्हाध्यक्ष डॉ. रवी मोरे, पीएम वाणीचे जयेश गाणेकर, राजेंद्र कारंडे, महेश ठोंबरे, यांनी मनोगत व्यक्त केले.
हातकणंगले येथील राजेंद्र कारंडे यांनी या योजनेच्या माध्यमातून पाच राऊटर खरेदी करून हातकणंगले येथील बहुतांशी भाग वायफायने जोडला आहे. नगरसेवक राजू इंगवले, मयूर कोळी, दीनानाथ मोरे, उमेश सूर्यवंशी, सुभाष मोरे, पांडुरंग सुभेदार आदी उपस्थित होते.