
बैलगाडी शर्यत.
०३२३८
हातकणंगले ः बैलगाडी शर्यतीतील एक क्षण.
---------
हैदर मुजावर यांची बैलगाडी प्रथम
हातकणंगलेत आयोजन; बंडा खसबे यांची गाडी द्वितीय
हातकणंगले ता. २६ ः संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ व बाबुजमाल तालीम मंडळ हातकणंगले यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाच्या माळावर बैलगाडी शर्यत झाली. उद्घाटन खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य अरूण इंगवले, यांच्याहस्ते केले.
निकाल अनुक्रमे असा ः जनरल बैलगाडी अ गट हैदर मुजावर (हातकणंगले), बंडा खसबे, बंडा खिलारे. जनरल बैलगाडी ब गट ः अमोल आरगे (माणकापूर), विजय पाटील (कोगनोळी), दिगंबर चव्हाण (हातकणंगले). जनरल आदत गट सचिन मंडले, समाधान सरगर, महादेव खरात. जनरल दुस्सा व चौस्सा गट सुरेश इरकर, राजू बेडगे, विजय माने.
बक्षिस वितरण हातकणंगलेचे नायब तहसिलदार दिगंबर सानप, पोलिस उपनिरिक्षक यशवंत उपराटे, अरूण इंगवले यांच्याहस्ते केले. नगराध्यक्ष अरुण जानवेकर, सुभाष मोरे, रावसाहेब कारंडे, विश्वजित मोरे, निलेश सुतार, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष संदिप यादव, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष महिपती बाबर, नगरसेवक राजु इंगवले, सचिन बोराडे, दिलिप मेंगणे, दयासागर मोरे आदी उपस्थित होते.