ग्राम दैवत श्री अंबाबाई मंदिर सुवर्ण कलश मिरवणुक उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राम दैवत श्री अंबाबाई मंदिर सुवर्ण कलश मिरवणुक उत्साहात
ग्राम दैवत श्री अंबाबाई मंदिर सुवर्ण कलश मिरवणुक उत्साहात

ग्राम दैवत श्री अंबाबाई मंदिर सुवर्ण कलश मिरवणुक उत्साहात

sakal_logo
By

01723

हुपरीत सुवर्ण कलशारोहण सोहळा सुरू
अंबाबाई मंदिर शिखर; राजीव महाराजांच्या उपस्थितीत आज प्रतिष्ठापना
हुपरी, ता. ५ : येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवी मंदिरावरील शिखरावर सुवर्ण कलशारोहणाच्या सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सुरूवात झाली. सकाळी जवाहर साखर कारखाना चौपाटी येथून सुवर्ण कलशाची सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीत देवीचे मानकरी, सेवेकरी, बारा बलुतेदार आदींसह डोईवर पाण्याचे कलश, तसेच शिदोरी घेऊन निघालेल्या महिलांसह अबालवृद्ध भाविक-भक्तांचा मोठा सहभाग होता. दत्त देवस्थान मठाचे (आडी) परमाब्धिकार राजीव महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) तारखेला कलशारोहण सोहळा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच संतमहंतांच्या भजन-कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
धडीमाल उत्पादक संघटनेतर्फे चार वर्षांपूर्वी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या शिखरावर सुवर्ण कलश प्रस्थापित करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्यास आज मूर्त स्वरूप आले. ३५ किलो तांबे वापरून बनवलेला सुवर्ण कलश पाच फूट उंचीचा असून सहाशे ग्रॅम सोन्याने मढलेला आहे. दानशूर व्यक्ती, भाविक, अंबाबाई भक्त मंडळ, चांदी कारागिर आदींच्या रोख रक्कम, सोने तसेच चांदीच्या स्वरूपात दिलेल्या दातृत्वातून हा सुवर्ण कलश साकारला आहे.
कलशावर कसबी कारागिरांकडून सुबक नक्षीकाम झाले आहे. चांदी उद्योजक संजय माने, यशवंतराव पाटील, शिवाजी हांडे, उदय वाशीकर, अमित नरके, आनंदा जाधव, अभिनंदन गाट, शहाजी गायकवाड, संजय घोरपडे, पिंटू मगदूम, शंकर जाधव, दीपक चव्हाण, गणेश बंडगर, रोहन माळी, मनोज चौगुले, विजय जोशी, प्रकाश देशपांडे, प्रकाश लाड, अशोक सुतार आदींच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b01944 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top