
प्रा. संध्या माने यांचा सत्कार
01778
-----
प्रा. संध्या माने यांचा सत्कार
हुपरी ः रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयाच्या प्रा. संध्या माने यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा आजी-माजी विद्यार्थ्यांकडून नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांच्याहस्ते सत्कार केला. अध्यक्षस्थानी प्राचार्या पी. बी. पाटील होत्या. प्रा. माने या चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाची पीएचडी पदवी प्राप्त केली. नगराध्यक्षा जयश्री गाट, पोलिस उपनिरीक्षक गणेश खराडे, प्राचार्या डॉ. पाटील, माजी विद्यार्थी सुरज बारगीर, सौरभ मुधाळे, ऋषिकेश कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. वीर सेवा दलाचे प्रांतीय अध्यक्ष अजित पाटील, रणजीत पाटील, मुबारक कोथळी, रवी पायमल आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Hup22b01974 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..