कल्लाप्पाण्णा आवाडेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्लाप्पाण्णा आवाडेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
कल्लाप्पाण्णा आवाडेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी

कल्लाप्पाण्णा आवाडेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी

sakal_logo
By

01806

-----------------
कल्लाप्पाण्णा आवाडेंचा
वाढदिवस विविध उपक्रमांनी
हुपरी, ता.५ : ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जवाहर साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना तसेच कामगार संघटना (इंटक) यांच्यातर्फे वृक्षारोपण, रक्तदान, गुणवंत विद्यार्थी सत्कार, कामगार प्रशिक्षण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने देश पातळीवरील साखर कारखानदारीमध्ये वेगळा ठसा उमटवलेला असल्याचे नमूद केले.
केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी बी. जी. कुरवलकर, कोल्हापूर गट कार्यालयाचे विजय शिंगाडे, संचालक सुरज बेडगे, अण्णासाहेब गोटखिंडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, कामगार मंडळ कोल्हापूरचे संचालक संघसेन जगतकर आदी प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात कल्लाप्पाण्णा आवाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ७५ मुला मुलींना शिष्यवृत्ती वाटप केली. रक्तदान शिबिरात १६० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कारखान्यातर्फे कामगारांसाठी २४ व्या प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ झाला. गत प्रशिक्षण वर्गातील अनुक्रमे विकास पर्वते, अनिल कांबळे, सुरज कणिरे, सौरभ कुलकर्णी आदी प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तीपत्रे दिली. यावेळी हाप पिच क्रिकेट स्पर्धाही झाल्या. संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी स्वागत केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. अण्णासाहेब गिरी यांनी सुत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b01989 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top