पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

हुपरीत पैसाफंड बँकेतर्फे
३१ पासून व्याख्यानमाला
हुपरी, ता. २३ : येथील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेतर्फे गणेशोत्सवानिमित्त बुधवार (ता. ३१) पासून व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे ४३ वे वर्ष आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली.
व्याख्यानमालेतील वक्ते आणि विषय असे - बुधवार (ता. ३१)- पत्रकार श्रीराम पचिंद्रे (सामाजिक साहित्य आणि पत्रकारिता), गुरुवार (ता. १) अमेय पोतदार तुरुंग अधिकारी रत्नागिरी (युवा पिढीपुढील आव्हाने आणि मार्ग), शुक्रवार (ता. २) वैशाली काशीद, राज्य कर उपायुक्त (जीवन सुंदर आहे), शनिवार (ता. ३) डॉ. अक्षय शिवछंद (कॅन्सर- समज गैरसमज व उपचार), रविवार (ता. ४) प्रमोद ढोले (व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्मिती), सोमवार (ता. ५) प्रा. डॉ. सुजय पाटील, (स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंद/आत्मचिंतन), मंगळवार (ता. ६) रवींद्र पायमल (नाट्यछटा), बुधवार (ता. ७) शिरीष महाराज मोरे (छत्रपती शिवाजी महाराज), गुरुवार (ता. ८) हळदी-कुंकू व महिला भजनी मंडळ भजन. त्या नंतर डॉ. प्राची घुणके (दोन शब्द... तिच्यासाठी). बँकेच्या एल. वाय. पाटील सभागृहात दररोज सायंकाळी साडेसहाला व्याख्याने होतील.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b02023 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..