हुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक
हुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक

हुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक

sakal_logo
By

छेडछाड काढल्याने
हुपरीत हाणामारी
दोघांना अटक; मोबाईलची केली मागणी
हुपरी, ता. ८ : येथे संभाजीनगर झोपडपट्टी परिसरात गणेश उत्सवात आरती करून येत असताना महिलेची छेडछाड काढण्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात काशीनाथ मुधाळे व सागर माळी (दोघेही हुपरी) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला पती व मुलांसह गणपतीची आरती आटोपून घरी निघाले असता संशयित आरोपी काशीनाथ मुधाळे याने पीडितेस मोबाईल नंबर दे, असे म्हणत पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न. त्या वेळी पीडिता, तसेच तिच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी काशीनाथ मुधाळे व त्याचा मित्र सागर माळी याने पीडितेस जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. घटनेनंतर हुपरी पोलिस ठाण्यासमोर संशयितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जमाव मोठ्या संख्येने थांबून होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b02040 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..