सभासदांच्या उन्नतीसाठी कटीबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासदांच्या उन्नतीसाठी कटीबद्ध
सभासदांच्या उन्नतीसाठी कटीबद्ध

सभासदांच्या उन्नतीसाठी कटीबद्ध

sakal_logo
By

सभासदांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध
बाबूराव पाटील; इंगळीतील शेतकरी सोसायटीची सभा
हुपरी, ता. १८ : इंगळी येथील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने गत सोळा वर्षांत सभासदांच्या हिताचा कारभार केला आहे. सभासदांच्या पाठबळामुळेच संस्थेची चाळीस लाखांची स्वमालकीची इमारत उभी राहू शकली. यापुढील काळातही सभासदांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी केले.
इंगळी येथील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. तीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब पाटील होते. रवींद्र चौगुले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हातकणंगले विभागीय अधिकारी आर. के. कांबळे, माजी शाखाधिकारी रामगोंडा हुपरे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष बाळासाहेब कोळी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत माजी खासदार निवेदिता माने व खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. अहवाल सालात एक लाख ७५ हजार ८१६ रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी नमूद केले. सचिव सुनील कोळी यांनी सभेपुढील विषयांचे तसेच अहवाल वाचन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b02049 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..