पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

हुपरीत एकाचा
आत्मदहनाचा प्रयत्न
हुपरी :पत्नी माहेरी गेल्याने निराश झालेल्या एका तरूणाने मध्यधुंद अवस्थेत येथील पोलीस ठाण्या समोरच अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, याबाबतची नोंद नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
येथील शौकत नामक तरूणाची पत्नी भांडण झाल्याने पुलाची शिरोली या गावी माहेरी गेलेली आहे. काल (ता. २४) तो पत्नी कडे गेला होता. त्यावेळी त्याची तेथील लोकां बरोबर बाचाबाची झाली. त्यामुळे वैफल्यग्स्त झालेल्या तरुणाने येथे येऊन पोलीस ठाण्या समोर गोंधळ घालत सोबत आणलेल्या बाटलीतून ज्वालाग्रही पदार्थ अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपनिरीक्षक गणेश खराडे, पोलीस उत्तम सावरतकर, निवृत्ती माळी, साताप्पा चव्हाण तसेच लोकांनी तसेच धाव घेत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.