पाणी पुरवठा योजना अहवालास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठा योजना अहवालास मंजुरी
पाणी पुरवठा योजना अहवालास मंजुरी

पाणी पुरवठा योजना अहवालास मंजुरी

sakal_logo
By

पाणीपुरवठा योजना
अहवालास मंजुरी
--
हुपरी पालिका सभा; पर्यवेक्षक पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

हुपरी, ता. २९ : येथील पालिकेच्या आज झालेल्या सभेत शहर पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्याबरोबरच कामगारांना सानुग्रह अनुदान व वैद्यकीय विम्याचा लाभ देण्यास मंजुरी दिली. पालिकेचे मिळकत पर्यवेक्षक सागर पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री गाट होत्या. शहरातील गट क्रमांक ९२५/१०/अ/१ या जागेसंदर्भात चर्चा सुरू असताना मिळकत पर्यवेक्षक पाटील यांच्या कामकाज पद्धतीचा मुद्दा उपस्थित झाला. भाजपचे पक्षप्रतोद रफिक मुल्ला, पिंटू मुधाळे, अमर गजरे आदींनी पर्यवेक्षक पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. सभा अधिकारी जानबा कांबळे यांनी पर्यवेक्षक पाटील यांच्यावरील कारवाईसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्याचे जाहीर केले.
शहरात मोकाट कुत्री, डुकरे, घोडी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पिंटू मुधाळे यांनी केली. कर्मचारी व कामगारांना सानुग्रह अनुदान व विम्याचा लाभ देण्यास दिरंगाई का केली जाते, असा सवाल संदीप वाईंगडे यांनी केला. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.