पट्टण कोडोली येथे जुगार अड्यावर हुपरी पोलीसांची धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टण कोडोली येथे जुगार अड्यावर हुपरी पोलीसांची धाड
पट्टण कोडोली येथे जुगार अड्यावर हुपरी पोलीसांची धाड

पट्टण कोडोली येथे जुगार अड्यावर हुपरी पोलीसांची धाड

sakal_logo
By

पट्टणकोडोलीत जुगार अड्ड्यावर छापा

हुपरी, ता. ९ : पट्टणकोडोली येथे पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर हुपरी पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली. या कारवाईत रोख चार हजार ९२० रुपयांसह सहा मोबाईल संच असा सुमारे पन्नास हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित सुभाष कोळी याच्या घरी तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी (ता. ८) रात्री अकराच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, राहुल दत्तात्रय जगदाळे (वय ३३), संजय दत्तात्रय पाटील (४४, दोघेही रा. बाजारपेठ, पट्टणकोडोली), धोंडीराम शिवाजी माळी (४२), महावीर राऊ शिरगुप्पे (५५), सुभाष दिनकर कोळी (४७), प्रकाश बाळू आवटे (४२, सर्व रा. शास्त्री चौक, पट्टणकोडोली). या संशयितांची जामिनावर सुटका झाली.