महिलेच्या मदतीला धावली खाकी वर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या मदतीला धावली खाकी वर्दी
महिलेच्या मदतीला धावली खाकी वर्दी

महिलेच्या मदतीला धावली खाकी वर्दी

sakal_logo
By

फोटो देत आहे
--------------------
महिलेच्या मदतीला
धावली खाकी वर्दी
-----
हुपरी, ता. १२ : वेळ रात्री आठ वाजताची. धो धो पाऊस कोसळतोय. निर्मनुष्य रस्ता... वाहनांची वर्दळ चाललेली. रस्त्याच्या कडेला एक अपघातग्रस्त महिला मदतीच्या प्रतीक्षेत पडलेली; पण थांबत तर कोणीही नव्हते. ही बाब रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारीतील व्यक्तीच्या नजरेस पडली. मोटार थांबवून खाली उतरत त्यांनी तिला धीर दिला. आस्थेवाईकपणे चौकशी करून तिला तिच्या मोपेडवरून सुखरूप मार्गस्थ केले.
प्रसंग आहे पुणे-बेंगलोर महामार्गावरील सरनोबतवाडी येथील मंगळवारी (ता. ११) रात्रीचा. महिलेच्या संकटकाळी धावलेली ती व्यक्ती म्हणजे येथील ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी होय. खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन त्यांनी यानिमित्ताने घडवले.
श्री. गिरी हे काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून महामार्गावरून परत येत होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला महिला पडलेली दिसली. पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने तिची मोपेड घसरून कडेला पडली होती. त्याखाली तिचा पाय अडकला होता. मदतीची याचना करत होती; पण पावसामुळे कोणीच थांबत नव्हते.
अशा वेळी श्री. गिरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मोटार थांबवली आणि तिला धीर दिला. नाव व गाव याची विचारपूस करत तिला तिच्या मोपेडवरून पुढे पाठवले. यावेळी श्री. गिरी यांच्यासोबत असलेले येथील माजी नगरसेवक अमेय जाधव यांनीही त्यांना साथ दिली.
--------
मदतीमधून आत्मीक समाधान
गरजवंताला मदत करणे ही आपली संस्कृती आहे. आपल्याकडे एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा अनादीकाळापासून आहे. एखाद्याच्या संकटात मदतीचे अनेक हात आपसूकच उभे राहतात. कारण ते आपले संस्कार आहेत. अशा मदतीमधून मिळणारे आत्मीक समाधान मोठे असते. त्यासाठी एखाद्या गरजूला मदत करताना नेहमी पुढे रहाणे आवश्यक आहे. काल सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी अपघातग्रस्त महिलेला मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले. प्रत्येकाने गरजूला मदत केल्यास त्यातून मिळणारे आत्मीक समाधान अमूल्य असते.