हुपरीत जुगार अड्यावर हुपरी पोलीसांचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरीत जुगार अड्यावर हुपरी पोलीसांचा छापा
हुपरीत जुगार अड्यावर हुपरी पोलीसांचा छापा

हुपरीत जुगार अड्यावर हुपरी पोलीसांचा छापा

sakal_logo
By

हुपरीत जुगार अड्ड्यावर छापा; आठ ताब्यात
हुपरी, ता. १२ : येथे पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर हुपरी पोलिसांनी छापा टाकून रोख ३२१ रु. व दोन मोबाईल असा २५ हजार ३२१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले तर सहाजण पसार झाले.
येथील शिवाजीनगरमधील संजय अशोक ससे याने पंचदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाचा परवाना घेऊन तिथे पैशांच्या स्वरूपात प्लास्टिक कॉईन देवून पत्त्यांचा जुगार अड्डा चालवायला दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. पोलीसांनी सतीश ससे (वय ३५ ), जगन्नाथ कुरणे (४५), महेश एकांडे (३०), शाहरूख मुजावर (२७) रघुनाथ चौगुले (४३, सर्व रा. हुपरी), बिरू कामन्ना (७३ रा. पट्टणकोडोली), प्रकाश साळोखे (३६, रा. यळगूड), कृष्णात मोरे (६३ रा. रेंदाळ) यांच्यावर कारवाई केली. पसार झालेल्या दीपक पुजारी (रा. रेंदाळ), महादेव लायकर, लहू गोसावी व संजय ससे ( तिघे रा. हुपरी), मारुती बिळगे (रा. मांगूर), बापू पमान्ना-बोते (रा. पट्टणकोडोली) यांच्यावर गुन्हा नोंद केला. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी, उपनिरीक्षक विजय मस्कर, उपनिरीक्षक रावसाहेब हजारे, पोलिस अल्पेश पोटकुले, एकनाथ भांगरे, सतीश इंगळे, लक्ष्मण ठोकळ आदींच्या पथकाने कारवाई केली.