जवाहर साखर कारखाना ऊस गळीत हंगाम प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवाहर साखर कारखाना ऊस गळीत हंगाम प्रारंभ
जवाहर साखर कारखाना ऊस गळीत हंगाम प्रारंभ

जवाहर साखर कारखाना ऊस गळीत हंगाम प्रारंभ

sakal_logo
By

01985
हुपरी : गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ करताना आमदार प्रकाश आवाडे व सौ. किशोरी आवाडे. सोबत कल्लाप्पाण्णा आवाडे, राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी आदी.
----------
साडेबावीस हजार हेक्टर उसाची नोंद
कल्लाप्पाण्णा आवाडे ; ‘जवाहर’च्या गाळप हंगामास प्रारंभ

हुपरी, ता. १५ : यंदाच्या हंगामात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे २२ हजार पाचशे हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक यंत्रसाममुग्री व ऊसतोडणी, वाहतूक यंत्रणा सज्ज असून सभासद व ऊस पुरवठादारांनी संपूर्ण ऊस ‘जवाहर’कडे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
कारखान्याच्या यंदाच्या ३० व्या गळीत हंगामासाठी काटापूजन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्याचा समारंभ आमदार प्रकाश आवाडे व त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे यांच्या हस्ते आज झाला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, ‘याआधी जाहीर केल्याप्रमाणे यंदा येणाऱ्या उसाची एफआरपीची रक्कम एकरकमी आदा करणार आहे. ऊस विकास योजनेच्या माध्यमातून सभासदांना मागणीनुसार ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची, रासायनिक खते व औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन सुरू आहे. ऊसविकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे अधिक ऊसउत्पादन मिळते, असे ते म्हणाले. माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, सूरज बेडगे आदींसह शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने होते.
-----------