आपतर्फे जवाहर कारखान्यास निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपतर्फे जवाहर कारखान्यास निवेदन
आपतर्फे जवाहर कारखान्यास निवेदन

आपतर्फे जवाहर कारखान्यास निवेदन

sakal_logo
By

आपतर्फे जवाहर कारखान्यास निवेदन
हुपरी, ता. २८ : एकीकडे उसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असताना दुसरीकडे उसाला वाढीव भाव मिळत नाही. अशा स्थितीत सभासदांकडून वाढीव शेअरची रक्कम वसूल करून घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पक्षातर्फे येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे केली आहे.
''आप'' च्या पदाधिकाऱ्यानी आज जवाहर येथे भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांकडून वाढीव शेअर्सची रक्कम न घेण्याची तसेच ज्या शेतकऱ्यांकडून सक्तीने पाच हजार रुपये वसुली केली आहे. ती शेतकऱ्यांना परतफेड करावी, अशी मागणी केली. आपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, शिरोळ तालुका संघटक शंकर जाधव, इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश सुतार, अरिहंत उपाध्ये, रावसो पाटील, इरफान रंगरेज आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.