हुपरी पालिकेची उपनगराध्यक्ष निवडीसाठी उद्या सोमवारी विशेष सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरी पालिकेची उपनगराध्यक्ष निवडीसाठी उद्या सोमवारी विशेष सभा
हुपरी पालिकेची उपनगराध्यक्ष निवडीसाठी उद्या सोमवारी विशेष सभा

हुपरी पालिकेची उपनगराध्यक्ष निवडीसाठी उद्या सोमवारी विशेष सभा

sakal_logo
By

हुपरी उपनगराध्यक्ष निवडीसाठी आज सभा

हुपरी, ता. ३०: येथील उपनगराध्यक्ष निवडीसाठी पालिकेची उद्या (ता. ३१) विशेष सभा बोलावण्यात आली आहे. पालिकेच्या पहिल्या सभागृहाची मुदत येत्या दोन महिन्यांत संपत असून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सत्ताधारी भाजपने उपनगराध्यक्षपद आमदार प्रकाश आवाडेप्रणित ताराराणी जिल्हा विकास आघाडीला देऊ केले आहे. त्यानुसार उपनगराध्यक्ष ‘ताराराणी’चाच होणार हे निश्चित आहे. सभेसाठी भाजप व ‘ताराराणी’च्या पक्षप्रतोदांकडून नगरसेवकांना ‘व्हीप’ बजावण्यात आला आहे. दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याकडून जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे यांच्या नावाला उपनगराध्यक्षपदासाठी हिरवा कंदील मिळाला असल्याचे सूत्रांकडून समजते.