हुपरीत मुख्याध्यापकाचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरीत मुख्याध्यापकाचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला
हुपरीत मुख्याध्यापकाचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला

हुपरीत मुख्याध्यापकाचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला

sakal_logo
By

हुपरीत मुख्याध्यापकांचा बंगला फोडला

हुपरी, ता. ३० : येथील महावीर नगरमधील एका मुख्याध्यापकांचा बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडला. बंद दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा हत्याराने उचकटून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याचे सकाळी शेजारील लोकांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी लाकडी कपाट फोडल्याचे तसेच त्यातील कपडे व इतर साहित्य विस्कटून टाकले आहे. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापक कुटुंबीयांसमवेत सहलीला बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे घटनेची नोंद पोलिसांत झालेली नसून चोरी कशाची आणि नेमका किती ऐवज गेला याची माहिती उपलब्ध झाली नाही.