जिल्ह्याच्या विकासासाठी गट तट पक्ष भेद बाजूला काम करण्याची भुमिका; सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याच्या विकासासाठी गट तट पक्ष भेद बाजूला काम करण्याची भुमिका; सतेज पाटील
जिल्ह्याच्या विकासासाठी गट तट पक्ष भेद बाजूला काम करण्याची भुमिका; सतेज पाटील

जिल्ह्याच्या विकासासाठी गट तट पक्ष भेद बाजूला काम करण्याची भुमिका; सतेज पाटील

sakal_logo
By

०२०१४
यळगूड : पाईपलाईन योजनेच्या लोकार्पण समारंभात बोलताना आमदार पाटील. सोबत आमदार आवळे, महावीर गाट, सुजितसिंह मोहिते, अजितसिंह मोहिते, सरपंच हजारे आदी.
--------------------------
जिल्ह्यात १२६४ पाणी योजनांना मान्यता
आमदार सतेज पाटील; यळगूडला थेट पाईपलाईनचे लोकार्पण

हुपरी, ता. ४ : जिल्हा नियोजन विभागातून जिल्ह्यातील १२६४ पाणी योजनांना मान्यता मिळाली आहे. एक हजार ६४ कोटीची कामे सुरू आहेत. २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण झाली पाहिजेत यासाठी आग्रही आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ते गट-तट पक्षभेद बाजूला सारून करण्यासाठीची प्रामाणिक भूमिका आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी यळगूड येथे केले.
पाच कोटी ४८ लाख रुपयांच्या दूधगंगा नदी ते यळगूड थेट पाईपलाइन योजनेचे लोकार्पण तसेच जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हनुमान दूध संस्थेचे कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते होते.
खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे संचालक महावीर गाट, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, सरपंच सुनीता हजारे, अजितसिंह मोहिते, अण्णासाहेब गोटखिंडे, उपसरपंच शेवंता गोटखिंडे, उत्तम कागले, जल उपअभियंता सुरेश कुलकर्णी, विस्तार अधिकारी एन. आर. रामाण्णा, ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब वीरकर उपस्थित होते.
खासदार माने म्हणाले, ‘यळगूडशी आजोबा दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांच्यापासून भावनिक नाते आहे. यळगूडच्या विकासकामांसाठी कटिबद्ध असेन.’ राजूबाबा आवळे म्हणाले, ‘हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी आग्रही राहिलो.’ सुजितसिंह मोहिते, अशोकराव माने, अण्णासाहेब गोटखिंडे यांचीही भाषणे झाली. सरपंच सुनीता हजारे यांनी स्वागत, अजितसिंह मोहिते यांनी प्रास्ताविक केले. अनिल रोटे यांनी आभार तर पूजा रेंदाळे - सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.