आमदार प्रकाश आवाडे यांची राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी फेरनिवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार प्रकाश आवाडे यांची राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी फेरनिवड
आमदार प्रकाश आवाडे यांची राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी फेरनिवड

आमदार प्रकाश आवाडे यांची राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी फेरनिवड

sakal_logo
By

राज्य साखर संघ संचालकपदी
प्रकाश आवाडे यांची फेरनिवड

हुपरी, ता. १० : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई या संस्थेच्या संचालकपदी फेरनिवड झाली.
साखर संघाची २०२२ ते २०२७ या वर्षांसाठीची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली. त्यात ही निवड झाली आहे. सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ कार्यरत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारी कारखानदारी तसेच वस्त्रोद्योग, सहकार, माजी सैनिक कल्याण आदिवासी विकास आदी खात्यांचे मंत्री म्हणून केलेल्या कामकाज आणि अनुभवाचा साखर उद्योगापुढील अडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल.