‘ज्येष्ठ नागरिक’तर्फ उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ज्येष्ठ नागरिक’तर्फ उपोषणाचा इशारा
‘ज्येष्ठ नागरिक’तर्फ उपोषणाचा इशारा

‘ज्येष्ठ नागरिक’तर्फ उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

‘ज्येष्ठ नागरिक’तर्फे
उपोषणाचा इशारा
हुपरी : येथील हुतात्मा स्मारक परिसरातील श्रीमती निवेदिता माने अभ्यासिका इमारत ज्येष्ठ नागरिक संघास देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (ता. १५)पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देण्यात आला आहे. संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी यासंदर्भात संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की निवेदिता माने अभ्यासिकेची इमारत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयासाठी देण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यासंदर्भात खासदार धैर्यशील माने तसेच पालिका पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासन आदींना भेटून प्रस्ताव मांडला आहे. मात्र, कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे उपोषण करीत आहे.