स्मार्ट, आदर्श तळंदगे हेच ध्येय ः संदीप पोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट, आदर्श तळंदगे हेच ध्येय ः संदीप पोळ
स्मार्ट, आदर्श तळंदगे हेच ध्येय ः संदीप पोळ

स्मार्ट, आदर्श तळंदगे हेच ध्येय ः संदीप पोळ

sakal_logo
By

68712
------
स्मार्ट, आदर्श तळंदगे
हेच ध्येय ः संदीप पोळ
बाळासाहेब कांबळे:सकाळ वृत्तसेवा
हुपरी, ता.१५: तळंदगेमधील नागरिकांना रस्ते, गटर्स, पाणी, आरोग्य या मुलभूत सुविधा देण्यासठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम केलेले आहे. तळंदगेला स्मार्ट आणि आदर्श बनवणे हेच ध्येय आहे. सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे हे पक्के ठरवून गावचा विकास साधने हा एकमेव हेतु आहे. जनतेने आपणावर विश्वास टाकावा त्यास तडा जाऊ देणार नाही, हे वचन असल्याचे प्रतिपादन सरपंचपदाचे उमेदवार संदीप अर्जुनराव पोळ यांनी केले.
उच्चविद्याविभूषित असलेले श्री. पोळ हे ताराराणी आघाडीचे उमेदवार आहेत. कृषी, दुग्ध आणि चांदी हा पारंपरिक व्यवसाय आणि गावच्या दक्षिणोत्तर निर्माण झालेली पंचतारांकित औद्योगिक वसाहत यामुळे गावचा विकास होणे गरजेचे होते. पण म्हणावा तितका शाश्वत विकास झाला नसल्याचे त्यांचे मत आहे. म्हणूनच अनेक संकल्प ऊरी बाळगून ते मतदार राजापुढे जात आहे. वडील अर्जुनराव पोळ यांनी ग्राम विकास अधिकारी म्हणून यळगुड व अन्य ठिकाणी निष्कलंक आणि प्रामाणिकपने काम केले. त्याची जाणीव ठेवत श्री. पोळ यांची वाटचाल सुरू आहे. सर्व घटकातील लोकांचा विकास व गावची उन्नती साधणे हा ध्यास आहे. यासाठी गावचा बहुउद्देशीय विकास आराखडा तयार केला आहे. गावचा चेहरामोहरा पालटण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता नसताना रखडलेली गावची पाणी योजना, बससेवा, तळंदगे फाटा जगन्नाथ मंदिर रस्ता दुरुस्ती, धोबी कट्टा, सार्वजनिक शौचालय सुविधा, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्याचे हवा, पाणी प्रदूषण, पंचगंगा नदी प्रदूषण आदी प्रश्नांच्या निर्गतीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
* माझे व्हिजन:
* तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे
* गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र
* ग्रामदैवत श्री जगन्नाथ मंदिरासह सामाजिक, धार्मिक स्थळे, गाव तलाव विकास
* महापुरुषांची स्मारके तसेच प्रेरणास्थळे निर्मिती
* शासनाच्या विविध योजनेतून गरजूंना घरकुले
* पर्यावरण, प्रदूषण, शेती आदी प्रश्नांची सोडणूक
* शासकीय, बिगर शासकीय संस्थांच्या माध्यमातून निधी मिळवणे