
खिलार जनावरांच्या प्रदर्शनास प्रतिसाद
02160
हुपरी: खिलार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अमित गाट, जयश्री गाट, उत्कर्ष सुतार, वैभव लवटे आदी उपस्थित होते.
--------
खिलार जनावरांच्या प्रदर्शनास प्रतिसाद
हुपरी, ता. १०: येथे खिलार प्रेमी ग्रुप व महावीर शंकरराव गाट सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित खिलार जनावरांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे खिलार प्रेमी ग्रुपतर्फे तीन वर्षांपासून जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी खिलार प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन युवा नेते अमित गाट यांच्याहस्ते झाले. विविध आठ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
विजेत्या स्पर्धकांना चांदीची गदा देवून गौरवले. प्रदर्शनात सहभागी जनावरांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक महावीर गाट सोशल फाउंडेशन होते. प्रदर्शनात १०० हून अधिक जनावारे सहभागी झाली होती.
यावेळी बोलताना अमित गाट यांनी पुढील वर्षापासून खिलार प्रदर्शन मोठ्या प्रमाणात घेण्याचा मानस व्यक्त केला. स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी शो वळू पुरस्कार रामचंद्र नभा जाधव (सिध्देवाड) यांच्या वळूला तर चॅम्पियन ऑफ दी शो गाय पुरस्कार अनिल कलिदास घाडगे ( भंडी शेगाव ) यांच्या गायीला दिला. माजी नगरसेवक गणेश वाईंगडे, सचिन गाट, संजय निकम, उदय शिंदे, अजित उगळे, राहुल गाट, संभाजी मोरे, मोहन सादळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन खिलार प्रेमी ग्रुपचे उत्कर्ष सुतार, वैभव लवटे, सतीश हांडे, ओंकार कुंभार, कुमार हांडे, संदीप बेडगे, रोहित लोहार, सर्वेश वनकुंद्रे, अभिजीत लवटे, शशिकांत माळी आदींनी केले.