
हुपरीच्या मैदानात प्रशांत जगताप विजयी
02171
हुपरी : श्री अंबाबाई देवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांक विजेता प्रशांत जगताप यास नगरपरिषद प्रशासकीय चषक अमित गाट यांनी प्रदान केला. सुभाष कागले, अजित पाटील, जावेद मुल्ला, किरण कांबळे, नेताजी निकम, रफिक मुल्ला आदी उपस्थित होते.
------------
हुपरीच्या मैदानात प्रशांत जगताप विजयी
ुहुपरी नगरपरिषद प्रशासकीय चषकाचा मानकरी; दीडशेवर कुस्त्या
हुपरी, ता.१५: येथील ग्रामदैवत अंबाबाई देवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात इचलकरंजीचा महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल प्रशांत जगताप याने गंगावेश तालमीचा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन भैरू माने यास चितपट करून प्रथम क्रमांकाचा हुपरी नगरपरिषद प्रशासकीय चषक पटकावला.
कोल्हापूर जिल्हा व राष्ट्रीय शहर तालीम संघाच्या मान्यतेने झालेल्या कुस्ती मैदानात दीडशेवर चटकदार कुस्त्या पहायला मिळाल्या. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विजयी भवानी आखाड्यातील कुस्ती मैदान शौकिनांच्या गर्दीने खचाखच भरलेले होते. द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पैलवान शशिकांत बोगांर्डे याने श्रीमंत भोसले याच्यावर मात करून मुख्याधिकारी चषक पटकावला. तृतीय क्रमांकासाठी सुशांत तांबोळकर ( जगन्नाथ कुस्ती संकुल, तळंदगे ) व रोहन रंडे (साई आखाडा मुरगुड) यांच्यात लढत झाली. त्यामध्ये सुशांत तांबोळकर विजयी झाला. चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कलिम मुल्लाणी (महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेश) याने ऋषिकेश पाटील (खेलो इंडिया८६ किलो सुवर्णपदक विजेता शाहुपुरी तालीम) याच्यावर विजय मिळवला.
कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान केल्याबद्दल हुपरीतील पैलवान श्रेयस गाट, श्रीनिवास खेमलापुरे, समर्थ गोंधळी, विश्वजीत गिरीबुवा, ओम माळी आदींचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार केला.