कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा

कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा

02182
हुपरी : भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलताना अमित गाट. शेजारी प्रकाश देशपांडे, सुभाष कागले, सुदर्शन खाडे आदी.
-------------
कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा
अमित गाट; हुपरीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा
हुपरी, ता. २४ : भाजपचे विचार आणि भाजपशासित केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्यांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा तसेच शहर कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा लवकरच घेण्याची घोषणा युवा नेते अमित गाट यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली.
भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौऱ्यात पक्ष बळकटीसाठी काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्या पार्श्वभूमवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाश देशपांडे होते.
अमित गाट म्हणाले, ‘हुपरी पालिकेत भाजपची पाच वर्षे निर्विवाद सत्ता राबवत असताना जनतेच्या हिताची कोट्यवधींची विकासकामे केली. यापुढेही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कार्यरत रहायचे आहे.’ शहर अध्यक्ष सुभाष कागले, प्रकाश देशपांडे, माजी अध्यक्ष उदय शास्त्री, माजी नगरसेवक सुदर्शन खाडे, सयाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नावर शक्ती प्रमुख, बूथ प्रमुखांचाही मेळावा घेण्याचे ठरले. युवामोर्चा तालुकाध्यक्ष सुहास जाधव, प्रकाश मुधाळे, सतीश कामिरे, नितीन शास्त्री, रामभाऊ मुधाळे, लक्ष्मण चनगुंडी, हणमंत आपटे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com