
"गांजा पदार्थांचे सेवन करताना सहा तरूणांना हुपरी पोलीसांनी रंगेहाथ पकडले"
गांजा सेवन करणाऱ्या सहा जणांना हुपरीत अटक
हुपरी, ता.३ : येथे गांजाचे सेवन करताना सहा तरुणांना हुपरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शुभम उमेश घोरपडे (वय २३, रा. चिटणीस चौक), मोहिन मैनुद्दीन मुजावर (वय २४, रा. संभाजी मानेनगर ), विनायक विलास शिंदे ( वय २२, रा. परीट गल्ली, राजगुरुनगर), राजअहमद फिरोज फरास (वय २२, रा. जुने एस टी स्टँड), महादेव बालासिंग बिसुकर्मा (वय २२, रा. ठोंबरे गल्ली, राजगुरुनगर) व प्रतीक अजित माने (वय २३, रा. वेताळ चौक, महावीरनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपी हे रात्री साडेदहाच्या सुमारास हुपरी ते कोल्हापूर मार्गावरील एका हॉटेलशेजारी उघड्यावर एकत्र गांजाचे सेवन करीत असताना मिळून आले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून, त्यांच्याकडे आधिक चौकशी सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी, उपनिरीक्षक गणेश खराडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल कोले, उत्तम सावरतकर, पोलिस नाईक अल्पेश पोटकुले, एकनाथ भांगरे, साताप्पा चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.