हुपरीच्या चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयास आयएसओ मानांकन " | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरीच्या चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयास आयएसओ मानांकन "
हुपरीच्या चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयास आयएसओ मानांकन "

हुपरीच्या चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयास आयएसओ मानांकन "

sakal_logo
By

02214
चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालयास ‘आयएसओ’
हुपरी : विद्यार्थ्यांनी स्वप्न साकार करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करावे, असे प्रतिपादन आयएसओ मानांकन समितीचे चेअरमन अनिल येवले यांनी येथे केले. आयएसओ मानांकन समितीने रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई-शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. समितीने प्राचार्य, महाविद्यालय विकास समिती, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांशी बैठक घेऊन कामकाज आढावा घेतला. आर्ट्स, कॉमर्स फॅकल्टीच्या विविध विभाग व समितीत्यांना भेट देऊन मार्गदर्शन केले. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मानसिंगराव देसाई, शिवराज नाईक, अजित पाटील उपस्थित होते. ग्रंथालय, जिमखाना विभाग, वसतिगृह व परिसराची पाहणी करून आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान केले. प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले यांनी स्वागत, प्रा. देवल तुळशीकट्टी यांनी प्रास्ताविक तर प्रा. डॉ. संतोष बराले यांनी आभार मानले.