ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात
ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात

ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

02222
हुपरी : सिद्धार्थनगरलगतच्या ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. (बाळासाहेब कांबळे: सकाळ छायाचित्रसेवा )
----------------------
लोगो ः सकाळ बातमीचा परीणाम
---------------
ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात
नागरिकांतून समाधान; हुपरी नगरपालिकेकडून कार्यवाही
हुपरी, ता. १६ : पालिकेतर्फे सुरु असलेल्या येथील सिद्धार्थनगरलगतच्या अंदाजित ६८ लाख रुपये खर्चाच्या एकशे दोन मीटरच्या ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वेळोवेळी सचित्र वृत्त प्रसिद्ध करुन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
शहराच्या कोल्हापूर वेस भागातील सिद्धार्थनगरजवळील ओढ्याची काही वर्षांत दुर्दशा झाली आहे. एकेकाळी स्वच्छ व नितळ असलेल्या ओढ्यात सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत आहे. ओढ्यात वाढलेली जलपर्णी व झाडे झुडपे तसेच मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ यामूळे पावसाळ्यात पुरामुळे ओढ्याचे पात्र बदलून पाणी लगतच्या अंगणवाडी, शाळा व शेतवडी परिसरात घुसत होते. त्यामुळे ओढ्याची डागडुजी करण्याची मागणी होत होती.
यासंदर्भात ‘सकाळ’ने वेळोवेळी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनापुढे मांडले होते. पालिकेतर्फे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत ओढ्याच्या पूर्व बाजूस दक्षिणोत्तर १०२ मीटर लांब व बारा फूट उंच काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी ६८ लाख रुपये खर्चाची तरतूद केली होती. त्यानुसार गत जानेवारी महिन्यात संरक्षक भिंत बांधकामास सुरुवात झाली. येत्या पंधरा दिवसांत या कामाची पूर्तता होईल असे बांधकाम ठेकेदारांकडून सांगण्यात आले.
"""""""
सिद्धार्थनगर कोल्हापूर वेस हा भाग शहराचे प्रवेशद्वार आहे. गांभीर्य लक्षात घेऊन तेथे स्वच्छ्ता राखण्याबरोबरच ओढ्यातील गाळ काढून खोली वाढवणे व रूंदीकरण करणे तसेच पावसाळ्यात पुरापासुन सुरक्षितता म्हणून संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय कारकिर्दीत घेतला. त्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यानुसार काम होत असून भविष्यातही सिद्धार्थनगर परिसर व ओढ्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.
-जयश्री गाट, माजी नगराध्यक्षा, हुपरी
"""""""""
सध्याच्या कामात संरक्षक भिंत बांधकामाची तरतूद आहे. त्यानुसार काम होत आहे. तथापि पावसाळ्यातील पुराच्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घेता ओढ्यातील गाळ काढण्या बरोबरच व रूंदीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार गाळ काढणे, खोली वाढवणे व रूंदीकरण आदी कामेही केली जाणार असून ती पूर्ण होण्याकडे कटाक्ष आहे.
-अनिता मधाळे, माजी नगरसेविका, प्रभाग क्रमांक १