आमचे नाते महाराष्ट्रातील मातीशी, जनतेशी

आमचे नाते महाराष्ट्रातील मातीशी, जनतेशी

०२२३९
हुपरी : मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा चांदीची तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महावीर गाट, माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, समरजित घाटगे, अमित गाट आदी उपस्थित होते.
..........
आमचे नाते महाराष्ट्रातील माती, जनतेशी
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; हुपरीत चांदी व्यावसायिकांतर्फे सत्कार

हुपरी, ता. २३ : ‘राजकारण नव्हे तर समाजकारण हे शिंदे परिवाराचे लक्ष्य आहे. आमचे नाते महाराष्ट्रातील मातीशी आणि सर्वसामान्य जनतेशी आहे. त्यांचा विकास साधणे आमचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व आहे. त्याच भावनेतून कार्यरत आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी येथे केले.
भाजप शहर शाखेतर्फे येथे आयोजित चांदी व्यावसायिक संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते महावीर गाट होते. मंत्री शिंदे यांच्या प्रयत्नाने येथील चांदी व्यावसायिकांना शासकीय ओळखपत्रे मिळाली. त्यानिमित्त त्यांचा हुपरीवासीयांतर्फे गाट यांच्या हस्ते चांदीची तलवार भेट देऊन सत्कार केला.
अमित गाट म्हणाले, ‘ग्रामीण भागातील चांदी व्यावसायिकांनाही शासकीय ओळखपत्रे मिळाली पाहिजेत. चांदी क्लस्टर योजनेतून भरीव निधी, हुपरीचा पर्यटन क्षेत्रात समावेश, चांदी कलादालन, बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर चांदी कामगार, कारागिरांना शासकीय योजनांचा लाभ मिळायला हवा.’
माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, अरुण इंगवले, हिंदुराव शेळके, अशोकराव माने, अमित गाट, राजेंद्र शेटे, सुभाषराव माळी, दिनकरराव ससे, चंद्रशेखर नाईक, माजी उपनराध्यक्ष सूरज बेडगे, अजितसिंह मोहिते, स्मिता शेंडुरे, माधुरी कुरणे, अमृत भोसले, सुदर्शन खाडे, रफीक मुल्ला, अजित पाटील आदी उपस्थित होते. सुभाष कागले यांनी स्वागत केले. मोहन वाईंगडे यांनी आभार मानले.
...............
मला मराठी चांगले कळते...
अमित गाट मंत्री शिंदे यांच्याविषयीच्या मानपत्राचे वाचन हिंदीतून करत होते. त्यावेळी त्यांना थांबवत मंत्री शिंदे यांनी आपल्याला मराठी चांगले कळते आणि बोलताही येते, असे म्हणत मानपत्राचे वाचन मराठीतून करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी भाषणही मराठीतूनच केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com