मोबाईल शॉपी चालकाची तळंदगे येथे आत्महत्या

मोबाईल शॉपी चालकाची तळंदगे येथे आत्महत्या

2299
...
तळंदगेत मोबाईल
शॉपी चालकाची आत्महत्या

हुपरी : तळंदगे येथील मोबाईल शॉपी चालकाने राहत्या घरी बेडरुममधील छताच्या पंख्यास इलेक्ट्रिक ईस्त्रीच्या वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली. रमेश रावसाहेब चौगुले (वय ३३, रा. महादेव मंदिरजवळ, तळंदगे) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रमेश यांची हुपरी येथे जुने बसस्थानक परिसरात मोबाईल विक्री शॉपी आहे. ते पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व आई-वडिलांसह तळंदगे येथे राहण्यास होते. सायंकाळी सहाच्या सुमारास पत्नी चहा पिण्यासाठी बोलावण्यास गेली असता रमेश यांनी वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये ‘आपल्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरू नये, घरच्यांनी मला माफ करावे’ असा मजकूर लिहिलेला आहे. घटनेची वर्दी चुलत भाऊ महेश दादासाहेब चौगले यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com