
शेतकरी सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचे इंगळीत उद्घाटन
02306
इंगळी : शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन वास्तू उद्घाटनप्रसंगी खासदार धैर्यशील माने, बाळासाहेब कोळी, बाबूराव पाटील, आण्णासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
-----------
शेतकरी सहकारी संस्थेच्या
नूतन वास्तूचे इंगळीत उद्घाटन
हुपरी, ता. २७: सहकार क्षेत्राची खडतर स्थितीतून वाटचाल सुरू असताना इंगळीसारख्या खेडेगावात स्थापनेच्या अवघ्या सतराव्या वर्षी शेतकरी सहकारी सेवा संस्था आपली स्वतःची वास्तू निर्माण करते ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
इंगळी येथील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने होते. सरपंच दादासाहेब मोरे, उपसरपंच स्वप्नाली भातमारे, डॉ. अण्णासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश खुडे, जिनेंद्र चौगुले, संचालक बाबासाहेब भातमारे, रमेश पाटील, बाळासाहेब पट्टेकरी, अर्जुन चौगुले, विकास माने, कृष्णात कोळसे, अब्दुलगणी मुल्लाणी, मानसिंग हावलदार, श्रीमाबाई पाटील, लक्ष्मी कदम आदी उपस्थित होते. स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कोळी यांनी केले. अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी प्रस्ताविक केले. बाबासाहेब बिरांजे यांनी आभार मानले.