
महाविद्यालयाचा विकास साधणे जबाबदारी
02330
हुपरी: चंद्राबाई शेंडूरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात बोलताना सुभाष पुजारी. शेजारी प्रा. डॉ. डी. आर. भोसले, अजित पाटील, शिवराज नाईक आदी.
-----
महाविद्यालयाचा विकास साधणे जबाबदारी
सुभाष पुजारी; शेंडूरे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
हुपरी, ता. ८ : करिअरच्या दृष्टीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महाविद्यालयातून परिपूर्ण शिक्षण मिळाले. महाविद्यालयात मिळालेल्या
ज्ञानामृतामुळे आपण एक यशस्वी नागरीक म्हणून घडू शकलो. अशा महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास साधणे ही माजी विद्यार्थी म्हणून आपली खुप मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी (मुंबई) यांनी येथे केले.
येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले होते.
प्रा. डॉ. भोसले यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेत अलीकडच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालय विकसित करणे गरजेचे असल्याचे सांगुन त्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगतात जुन्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत सहकार्याच्या भावना व्यक्त केल्या. मेळाव्यास सचिन गाट, राहुल इंग्रोळे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने, प्रा. डॉ. एस. एम. गावडे, प्रा. एस. एस. संभोजी आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पाटील यांनी केले. उपाध्यक्ष शिवराज नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. खजिनदार सुनील बारगे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन समन्वयक प्रा. डॉ. श्रीमती संध्या माने यांनी केले.