Sun, October 1, 2023

हुपरीत विलास पाटील यांचे प्रवचन
हुपरीत विलास पाटील यांचे प्रवचन
Published on : 17 May 2023, 12:05 pm
हुपरीत विलास पाटील यांचे प्रवचन
हुपरी : चराचरामध्ये भगवंत सामावलेला आहे. परमेश्वर नाही अशी पृथ्वीतलावर एकही जागा नाही. प्राणवायूचे अस्तित्व तसेच परमेश्वराचे आपल्या सभोवताली अस्तित्व आहे. म्हणूनच परमेश्वरावर निष्ठा ठेवा कारण परमेश्वरावरील निष्ठाच माणसाला सर्वश्रेष्ठ बनवते, असे विचार विलास पाटील (महाराज) यांनी येथे व्यक्त केले. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. विठ्ठल-रखुमाई पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सप्ताह कमिटी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, चंद्रकांत विभूते, शिवाजी गिरीबुवा, सुनील नेमिष्टे, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब देसाई, एस. वाय. वाईगडे, बाबासाहेब गोंधळी, काकासाहेब हांडे आदी उपस्थित होते.