राज्यपाल बैस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

राज्यपाल बैस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

02341
मुंबई: निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुनिता नाशिककर लिखित ‘मी पोलिस अधिकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आमदार संजय केळकर, नम्रता अलकनुरे, अमर कुलकर्णी आदी.
...

‘मी पोलिस अधिकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन
हुपरी : निवृत्त पोलिस उपअधीक्षक (गृह) सुनिता नाशिककर लिखित ‘मी पोलिस अधिकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे नुकतेच झाले. यावेळी राज्यपाल बैस म्हणाले , ‘ खेडेगावातील एक मुलगी पोलिस दलात जिद्दीने सामील होते आणि आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करते, हे कौतुकास्पद आहे.’ पुस्तकातील अनेक घटनांचा उल्लेख करून नाशिककर यांच्या कार्याचे मुलींनी अनुकरण करण्याचे त्यांनी आवाहन केले. आमदार संजय केळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com