
बार व्यवस्थापक मारहाण व रक्कम पळविणाऱ्या एकास अटक
बार व्यवस्थापकास मारहाण
केल्याप्रकरणी एकास अटक
हुपरी, ता.१ : येथे बीअरबारमध्ये झालेल्या बिलाचे पैसे न देता दादागिरी करत बार व्यवस्थापकास मारहाण करून गल्ल्यातील रोख तीन हजार सहाशे रुपयांची रक्कम पळवून नेणाऱ्या एकास हुपरी पोलिसांनी अटक केली. वैभव तानाजी शेलार (रा. हुपरी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी उदय वासू शेट्टी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशयित वैभव शेलार हॉटेल अपेक्षा परमिट रूम व बीअरबार येथे मंगळवारी (ता.३०) रात्री खाण्यापिण्यासाठी गेला होता. त्यावेळी झालेल्या चार हजार तीनशे रुपयांचे बिल न भागवताच तो जात असल्याचे पाहून व्यवस्थापक उदय शेट्टी यांनी त्याच्याकडे बिलाची मागणी केली. शेलार याने ‘बिल कोणाकडे मागतोस, बिल देत नाही काय करायचं ते कर’ असे म्हणत शेट्टी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून हाताने तोंडावर व छातीवर मारहाण केली. तसेच गल्ल्यात हात घालून त्यामधील तीन हजार सहाशे रुपयांची रक्कम हिसकावून घेत मोटारसायकलवरून पसार झाला होता. घटनेची नोंद होताच पोलिसांनी त्यास आज अटक केली.