
उपचारासाठी बिन व्याजी कर्जाचा निर्णय कौतुकास्पद
01196
-----
उपचारासाठी बिन व्याजी कर्जाचा निर्णय कौतुकास्पद
बाबुराव महामुनी; भैरवनाथ संस्थेच्या केअर हॉस्पीटलमध्ये सुविधा
इचलकरंजी, ता.११ : उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय निश्चितपणे कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या माणुसकी फौंडेशन आणि सेवावृत्तीने वैद्यकिय क्षेत्रात सेवारत असलेल्या केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने कोणीही गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण वैद्यकिय उपचारापासून वंचित राहू नये यासाठी लहान मुलांवर मोफत उपचार, खर्चिक उपचारांसाठी बिनव्याजी कर्ज, मोफत शस्त्रक्रिया आदी उपचार सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या सेवेच्या माहितीपत्रकाचे अनावरण श्री. महामुनी यांच्याहस्ते केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
केअर हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, ‘पैशाअभावी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येणे अशक्य असल्याने अनेक रुग्णांनी उपचाराविना प्राण गमावले आहे. मात्र आता पैसे नाहीत म्हणून कोणीही उपचाराविना राहणार नाही आणि कोणालाही प्राण गमवावा लागणार नाही असा संकल्प माणुसकी फौंडेशन व केअर हॉस्पिटल यांनी केला आहे.’
स्वागत प्रथमेश इंदुलकर यांनी केले. रवी जावळे यांनी आणखीन चांगले काम करून उपचाराविना कोणीच राहणार नाही यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. डॉ. शुभांगी पाटील, व्यवस्थापक अनिकेत कांबळे, अमोल पाटील, सनी आवळे, वैशाली पाटील, किशोर निकम, अजीत अस्वले आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02733 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..