हरीष बोहरा निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरीष बोहरा निधन
हरीष बोहरा निधन

हरीष बोहरा निधन

sakal_logo
By

३१७९५
उद्योगपती हरीष बोहरा यांचे निधन
इचलकरंजी, ता. २५ : येथील उद्योगपती हरीष श्रीनिवास बोहरा (वय ३९) यांचे निधन झाले. वस्त्रोद्योगातील अग्रगण्य अशा स्वदेशी ग्रुपचे ते प्रमुख होत. शहरातील विविध क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. शतकोत्तर शैक्षणिक संस्था असलेल्या श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा ते गेली चार वर्षे सांभाळत होते. मदनलाल बोहरा कापड मार्केटचे ते विद्यमान संचालक होते. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची वेगळी ओळख होते. कांही दिवसांपासून ते आजारी होते. पुणे येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (रविवार) सकाळी ९ वाजता त्यांच्या राजर्षी शाहू पुतळा परिसरातील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. प्रख्यात उद्योगपती (कै.) मदनलाल बोहरा यांचे ते नातू होत.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02762 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top