स्मार्ट टेक्स्टाईल्स अर्थात भविष्यातील वस्त्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट टेक्स्टाईल्स अर्थात भविष्यातील वस्त्रे
स्मार्ट टेक्स्टाईल्स अर्थात भविष्यातील वस्त्रे

स्मार्ट टेक्स्टाईल्स अर्थात भविष्यातील वस्त्रे

sakal_logo
By

40686
-------
स्मार्ट टेक्स्टाईल्स अर्थात भविष्यातील वस्त्रे

एकविसाव्या शतकात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्पादन संबंधित विकासामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. या विकासाच्या शर्यतीत वस्त्रोद्योग ही अग्रेसर आहे. भारतीय ब्रँडने फॅशन मार्केटमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे व ते वाढतच राहणार आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा वापर करून मागणीनुसार कपडे बनवणे. फॅशन तसेच योग्य परिणाम देण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्त्रांमध्ये सध्या ‘स्मार्ट टेक्स्टाईल्स’चा समावेश होतो. ‘स्मार्ट टेक्स्टाईल्स’ म्हणजे कापडनिर्मिती क्षेत्रामध्ये नवनवीन कल्पना वापरून प्रतिसादाचे आकलन आणि विश्‍लेषण करू शकणारे वस्त्र असे म्हणता येईल.
- प्रा. डॉ. सचिन लांडगे
- प्रा. सौ. स्वाती विशाल चव्हाण

भारत हा जगातील सर्वात मोठ्या वस्त्र उत्पादक देशांपैकी एक आहे. वस्त्रोद्योग संबंधित जागतिक व्यापारामध्ये भारताचा ५ टक्के वाटा आहे. कापड आणि पोशाख निर्यात करणारा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश म्हणून भारताला ओळखले जाते. तसेच पीपीएफ उत्पादनांमध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील वस्त्रोद्योग १०० दशलक्ष लोकांना थेट रोजगार मिळवून देत आहे. रेशीम उत्पादनांच्या बाबतीत भारताचा जगातील दुसरा क्रमांक येतो आणि जगभरातील हाताने विणलेले ९५ टक्के कापड भारतातून येते.
डिसेंबर २०२१ पर्यंत भारतातील वस्त्रोद्योग आणि पोशाख उद्योगातील एफडीआय डॉलर ३.९ अब्जपर्यंत पोहोचले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारताची कापड आणि पोशाखांची निर्यात डॉलर १०० अब्जापर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. २०२५-२६ पर्यंत याचा आकार डॉलर १९० अब्जपर्यंत पोहोचावा यासाठी सात मेगा टेक्स्टाईल पार्कची योजना आखली आहे.
वस्त्रोद्योग व त्या संदर्भातील तंत्रज्ञान व वस्त्रांचे भविष्य याचा विचार करता असे लक्षात येते की फॅशन आणि ट्रेंडसंदर्भात भारतामध्ये प्रचंड उत्पादन क्षमता आहे. भारतीय ब्रँडने फॅशन मार्केटमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे व ते वाढतच राहणार आहे. फॅशन आणि ट्रेंडनुसार तांत्रिकदृष्ट्या योग्य परिणाम देणाऱ्या वस्त्रांनाही प्रचंड मागणी आहे. याला अनुसरून वस्त्रोद्योग तंत्रज्ञानामध्ये अपेक्षित असणारी पुढील गोष्ट म्हणजे ‘जस्ट इन टाईम’ तंत्रज्ञानाचा समावेश करणे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा वापर करून मागणीनुसार कपडे बनवणे. फॅशन तसेच योग्य परिणाम देण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्त्रांमध्ये सध्या ‘स्मार्ट टेक्स्टाईल्स’चा समावेश होतो. ‘स्मार्ट टेक्स्टाईल्स’ म्हणजे कापडनिर्मिती क्षेत्रामध्ये नवनवीन कल्पना वापरून प्रतिसादाचे आकलन आणि विश्‍लेषण करू शकणारे वस्त्र असे म्हणता येईल.
स्मार्ट टेक्स्टाईल्सची संकल्पना सर्वप्रथम १९८९ मध्ये जपानमध्ये मांडली गेली. यामध्ये शेप मेमरी म्हणजेच आकार लक्षात ठेवणारा रेशीम धागा बनवला गेला. स्मार्ट टेक्स्टाईल्सचा नेमका अर्थ सांगायचे झाले तर टेक्स्टाईल तथा कापड वा कपडे जे पर्यावरणातील उत्तेजनांना जाणण्यासाठी सक्षम आहेत व त्यांना योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी आणि वस्त्रांच्या संरचनेतील कार्यक्षमता एकत्रित करून त्यांच्याशी जुळवून घेण्यास सक्षम आहेत. उदाहरणार्थ एखादे कापड अथवा वस्त्र वातावरणातील तापमानानुसार त्यांचा रंग बदलते. अशा पद्धतीने स्मार्ट टेक्स्टाईल्स हे कापड बनवताना वापरले गेलेले मटेरियल, केमिकल व त्यांची संरचना याद्वारे पर्यावरणातील परिस्थितीनुसार नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करतात आणि त्यावर योग्य प्रतिक्रिया देऊ शकतात. स्मार्ट टेक्स्टाईल्समध्ये योग्य प्रतिक्रिया मिळण्यासाठी विशिष्ट रसायने, सेन्सर, चुंबक, अ‍ॅक्युएटर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादींचा वापर करून विशिष्ट नियंत्रक प्रणाली विकसित करता येते.
स्मार्ट टेक्स्टाईल्सद्वारे मिळणाऱ्या प्रतिसादांवरून त्यांची निष्क्रिय (पॅसीव) स्मार्ट वस्त्रे, सक्रिय स्मार्ट वस्त्रे आणि अति स्मार्ट वस्त्रे अशी विभागणी करता येते. निष्क्रिय स्मार्ट वस्त्रे वातावरणातील बदल ओळखू शकतात. म्हणजेच ते सेन्सर म्हणून काम करतात. स्मार्ट वस्त्रे वातावरणातील बदल ओळखून त्याला प्रतिसाद देऊ शकतात. अति स्मार्ट वस्त्रांमध्ये वातावरणातील बदल ओळखून त्या बदलांनुसार जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये विशिष्ट प्रकारचे बदल घडवून आणण्याची क्षमता असते. अशातऱ्हेने स्मार्ट वस्त्रांद्वारे पाच मूलभूत क्रिया घडवून आणल्या जाऊ शकतात. त्या म्हणजे सेन्सर्स, डेटा प्रोसेसिंग, अ‍ॅक्युएटर, स्टोअरेज आणि कम्युनिकेशन. योग्य ते थर्मल, कॅपिटल तथा इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्माद्वारे प्रतिक्रिया मिळवण्याकरिता स्मार्ट वस्त्रे बनवताना विशेष तंत्रज्ञान वापरून वस्त्रांची संरचना करावी लागते, मात्र अशी संरचना करताना वस्त्रांचा आरामदायीपणा (कम्फर्ट) आणि टिकाऊपणा यासारखे मूळ गुणधर्म अबाधित राहणे गरजेचे असते.
मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मटेरियल सायन्स, पॉलिमर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी इ. सारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. स्मार्ट टेक्स्टाईल्सचा वापर आरोग्य सेवा, संरक्षक प्रावरणे, अग्निशमन, लष्कर, ई-टेक्स्टाईल्स, बायोमेडिकल अ‍ॅप्लिकेशन, स्पोर्टस् ड्रेसेस, अंतराळामध्ये वापरण्यासाठीची वस्त्रे आदीसारख्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात केला जातो.
वस्त्रोद्योग अभियांत्रिकी क्षेत्रातील ‘स्मार्ट टेक्स्टाईल्स’ ही सर्वात रोमांचक कल्पना आहे. भविष्यामध्ये विविध कार्यप्रणाली देणाऱ्या उपकरणांचा वस्त्रांमध्ये वापर करून बनवली जाणारी स्मार्ट वस्त्रे म्हणजे वस्त्रोद्योगातील क्रांती ठरेल. यामुळेच स्मार्ट टेक्स्टाईल्स ना फ्युचर टेक्स्टाईल्स तथा पुढच्या पिढीची भविष्यातील वस्त्रे असेही म्हणता येईल.

------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02791 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..