इचलकरंजीत १४५० दाखले वितरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत १४५० दाखले वितरीत
इचलकरंजीत १४५० दाखले वितरीत

इचलकरंजीत १४५० दाखले वितरीत

sakal_logo
By

इचलकरंजीत १४५० दाखले वितरित
४८ शाळांमधील एक हजार ७५० विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव दाखल
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० ः शालेय स्तरावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देणे या विशेष उपक्रमात इचलकरंजी शहरातील सुमारे ४८ शाळांमधील सुमारे १ हजार ७५० विद्यार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यामधील ५५० अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. त्यापूर्ण करून २५० जणांचे दाखले दिले. मात्र दाखल्यांसाठी आवश्यक असलेले १९५० ते १९६७ पूर्वीचे दस्तावेज नसल्याने अद्याप ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्‍या लाभापासून मुकावे लागत आहे. दरम्यान इचलकरंजी कार्यालयाकडून १ हजार ४५० जातीचे दाखले केवळ ५० रुपये फीमध्ये वितरीत केले आहेत.
जातीचे दाखले काढण्यासाठी अनेक एजंट १ हजार ५०० रुपयांपर्यंत रक्कम घेताना दिसतात. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्‍या लाभापेक्षा अधिक रक्कम दाखल्यांना द्यावी लागत होती. परिणामी पालक दाखले काढण्याचे टाळत असत. मात्र या उपक्रमात केवळ ५० रुपये आकारणी होत असल्याने पालकांमधून प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी महा ई सेवा केंद्रामध्ये जमा केलेली कागदपत्रे घेऊन शालेय स्तरावर जमा केली. पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यामधील ४५० अर्जातील कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या त्या दूर करून २०० जणांना दाखले दिले. दुसऱ्या टप्प्यामध्ये ८०० अर्ज दाखल केले होते. त्यामधील २०० अर्ज प्रलंबित आहेत. संबंधित शाळांना व पालकांना त्रुटी सांगितल्या आहेत. त्याची पूर्तता झाल्यास त्यांनाही दाखले देण्यात येणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी जातीच्या दाखल्या विना शिष्यवृत्ती व अन्य लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष उपक्रम राबवला होता. याबाबत अपर तहसील कार्यालयाने २६ डिसेंबर २०२१ रोजी पत्राद्वारे आपल्या क्षेत्रात असणाऱ्‍या शाळा, विद्यालय, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना सूचना केल्या होत्या. शाळांच्या परिसरातील महा ई सेवा केंद्राच्या समन्वयाने जातीच्या दाखल्यांसाठी अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले होते. इचलकरंजी तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या १६४ शाळा व १७ महा ई सेवा केंद्रांना या उपक्रमात सहभागी केले होते.
------------
ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्याची माहिती महा ई सेवा केंद्रांमार्फत दिली आहे. त्यांनी ती पूर्ण केल्यास त्यांना दाखले मिळतील. त्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
-शरद पाटील, अपर तहसीलदार, इचलकरंजी
------------------
जात वर्ग*किती साल पूर्वीचा पुरावा आवश्यक

एस सी*१९५० पूर्वीचा
ओ बी सी*१९६७ पूर्वीचा
एस बी सी*१९६७ पूर्वीचा
वी जे एन टी*१९६३ पूर्वीचा
एन टी*१९६३ पूर्वीचा

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02803 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..