गणेश चतुर्थीच्या नियोजनसाठी आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश चतुर्थीच्या नियोजनसाठी आज बैठक
गणेश चतुर्थीच्या नियोजनसाठी आज बैठक

गणेश चतुर्थीच्या नियोजनसाठी आज बैठक

sakal_logo
By

गणेश चतुर्थीच्या
नियोजनसाठी आज बैठक
इचलकरंजी ः गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेने नियोजनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीची बैठक आयोजित केली आहे. उद्या (ता. १७) दुपारी चार वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात ती होणार आहे. बैठकीसाठी शासकीय यंत्रणा,
लोकप्रतिनिधी तसेच शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे. इचलकरंजीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इचलकरंजीत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून गणेशोत्सव साजरा होण्यासाठी महापालिका, पोलिस, महसूल यांसह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणा, शहरातील लोकप्रतिनिधी यांच्यासह शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक महानगरपालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी आयोजित केली आहे. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02813 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..