....अन्यथा बाजारभावाप्रमाणे वसुली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

....अन्यथा बाजारभावाप्रमाणे वसुली!
....अन्यथा बाजारभावाप्रमाणे वसुली!

....अन्यथा बाजारभावाप्रमाणे वसुली!

sakal_logo
By

....अन्यथा बाजारभावाप्रमाणे वसुली!
---
शिरोळ तहसीलदार; उत्पन्न वाढलेल्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन
शिरोळ, ता. १७ ः तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत सवलतीच्या दरात धान्य घेणाऱ्या कुटुंबाचे, वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ४४ हजार व शहरी भागासाठी ५९ हजार रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी सवलतीच्या दरातील अन्नधान्य योजनेतून बाहेर पडून अर्ज शासनाकडे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.
तहसीलदार मोरे-धुमाळ यांनी पत्रकात म्हटले आहे, की शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय अन्यसुरक्षा अंतर्गत सवलतीच्या दरात धान्य घेणारे अंत्योदय अंतर्गत चार हजार ६२६ लाभार्थी व प्राधान्य लाभार्थी ५४ हजार ९६५ अशी एकूण ५९ हजार ५९१ कुटुंबे आहेत. शासन स्तरावर या योजनेबाबत सुधारित निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपेक्षा जास्त आणि शहरी भागातील पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपेक्षा जास्त झाले असेल, तसेच या लाभार्थ्यांच्या घरी चारचाकी वाहन असेल, काही लाभार्थी प्राप्तिकर भरत असतील अशा सर्व लाभार्थ्यांनी या योजनेतून बाहेर पडावे. यासाठी शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिली आहे. यानंतर अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी या योजनेतील लाभार्थ्यांची स्थानिक स्तरावर चौकशी होऊन ज्यांचे उत्पन्न वाढले असेल, अशा सर्व लाभार्थ्यांनी धान्याचा लाभ घेतला असेल, तर अशा सर्व लाभार्थ्यांकडून बाजारभावाने रक्कम वसूल करण्याचा निर्णय शासन स्तरावर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय अन्यसुरक्षा योजनेंतर्गत सध्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी वार्षिक उत्पन्न वाढले असेल, तर त्यांनी या योजनेतून बाहेर पडावे व आपले अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत जमा करावेत, असे आवाहन मोरे-धुमाळ यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02816 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..