गणेशोत्सव मंडळांची संख्या यंदा वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव मंडळांची संख्या यंदा वाढणार
गणेशोत्सव मंडळांची संख्या यंदा वाढणार

गणेशोत्सव मंडळांची संख्या यंदा वाढणार

sakal_logo
By

गणेशोत्सव मंडळांची
संख्या यंदा वाढणार
महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी; कार्यकर्ते लागले तयारीला

इचलकरंजी, ता. १७ ः राज्य सरकारने गणेश चतुर्थीवरील निर्बंध हटविल्याने इचलकरंजी शहरात सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्ती प्रतिष्ठापणा करण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी शहरात सुमारे ७७२ सार्वजनिक मंडळांनी श्री मूर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. मात्र यंदा निर्बंध हटवल्याने तसेच महापालिका निवडणुकीमुळे तरुणांमधून उत्साह दिसून येत आहे. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी नव्याने गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची यंदा संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तीन वर्षापासून आर्थिक बोजाखाली सापडलेले कुंभार बांधवांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गणेश चतुर्थीस तेरा दिवसाचा कालावधी राहिल्याने सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते मंडप, लायटिंग, अन्य सजावट पूर्ण करण्याच्या कामाला झपाटून लागले आहेत. शहरात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी मंडळाचे कार्यकर्ते काम करीत असताना दिसत आहेत. २०१९ महापूर व कोरोना यामुळे तीन वर्षाची मरगळ झटकून कार्यकर्ते नव्या जोमात गणेश चतुर्थीची तयारी करताना दिसत आहेत. तर या सणवार अवलंबून असणारे व्यावसायिकही विक्रीसाठी लागणाऱ्‍या साहित्यायी ऑर्डर देत आहेत. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव तरुणांसोबत व्यवसायिकांनाही फलदायी ठरणार असल्याचे दिसत आहे.
शहरातील बहुतांशी मंडळाणी आपल्या पसंतीच्या गणेशमुर्त्या बुकिंग केल्या आहेत. काही मंडळे अद्याप कुंभार गल्ली व गणेश स्टॉलच्या चकरा मारीत आहेत. सुमारे ८० टक्के नागरिकांनी घरगुती श्रींच्या मुर्त्या बुक केल्या आहेत. सार्वजनिक गणेशमुर्तीची उंचीची मर्यादा हटवण्यात आल्याने उंच मूर्त्यांची मागणी वाढली आहे. गेली तीन वर्षे महापूर व कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेला कुंभार समाज यावर्षी नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पर्यावरणप्रेमींकडून शाडूच्या गणपती मुर्त्यांची मागणी होताना दिसत आहे.
-------------------
तीन वर्षाचे नुकसान भरून काढणार
२०१९ पूर्वी शहराची गणेश उत्सवाच्या कालावधीमधील केवळ मुर्तीची उलाढाल सुमारे १ कोटी ५० लाख इतकी होती. मात्र कोरोनामुळे ३० लाखांवर येवून ठेपली आहे. तर गतवर्षी कोरोनामुळे श्री च्या मुर्ती खपात मोठी घट झाली होती. ते नुकसान भरून काढण्यासाठी कुंभार बांधावानी कंबर कसली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02817 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..