डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

01323
---------
‘डीकेटीई’मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी ः राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून डीकेटीई हायस्कूलमध्ये क्रीडाधिकारी बालाजी बडबडे यांच्याहस्ते हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत थाळीफेक या क्रीडाप्रकारात प्रशालेच्या स्वानंद कुंभोजे याने सुवर्णपदक प्राप्त केले. त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी गुवाहाटी येथे निवड झाली आहे. बुद्धिबळ स्पर्धेत प्रियदर्शनी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल दोघांचा सत्कार केला. यशस्वी विद्यार्थ्यांना संभाजी बंडगर, कार्तिक बचाटे यांनी मार्गदर्शन लाभले.
------------------
01322
उत्कर्ष शेंडगेचे यश
इचलकरंजी ः तासगाव (जि. सांगली) येथे उत्तम भाऊ शेंडगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्कर्ष आप्पासो शेंडगे (सरस्वती हायस्कूल) याने द्वितीय क्रमांक मिळवला. अस्खलित वक्तृत्व, सभाधीटपणा, स्पष्ट उच्चार या गुणांच्या जोरावर उत्कर्ष याने यश प्राप्त केले. मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, महावीर कांबळे, अनुराधा काळे, आप्पासो शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02824 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..