संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

अभिषेक पाटील यांचा राजीनामा
इचलकरंजी : स्वाभिमानी युवक संघटनेचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी गेल्या वर्षीपासून युवक संघटना अध्यक्ष पदभार स्वीकारला होता. यावेळी त्यांनी इचलकरंजी शहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच इतर कामगार, व्यापारी, शिक्षक, यंत्रमाग आदींसंदर्भातील प्रश्न आहेत. याव्यतिरिक्त शहरातील आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते या समस्या सोडवणे गरजेचे आहे. यापुढेही समाजकार्यात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले.
----------------
‘आयटीडब्ल्यू’ची कार्यशाळा
इचलकरंजी ः इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये आय. टी.डब्ल्यू. या आंतरराष्ट्रीय कंपनीची कार्यशाळा झाली. ‘मेटल वर्किंग अँड मेटल प्रोटेक्शन’ या सीएनसीवरील काम्पोनंट टूलसाठी लागणारे कुलंड ऑईल, टूल्सची देखरेख, जेट मिक्सर, ऑनलाईन फिल्टरेशन मशिन, बायोकुल कुलंट प्रोडक्ट, रस्ट प्रिव्हेंटिव्ह ऑइल, वॉटरलेस हँडवॉश याविषयी माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली. आय. टी. डब्ल्यू. केमिनचे ग्रुप हेड मनीष पारेख, एरिया मॅनेजर धैर्यशील पाटील, हेमंत कुलकर्णी, काशिनाथ जगदाळे, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02829 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..