भटक्या गायीस लम्पी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या गायीस लम्पी?
भटक्या गायीस लम्पी?

भटक्या गायीस लम्पी?

sakal_logo
By

भटक्या गायीस लम्पी?
इचलकरंजीत पशुवैद्यकीय अधिकारी, प्रशासनाकडून शोध सुरू
इचलकरंजी, ता.१९ ः हातकणंगले तालुक्यात लम्पी रोगाचे संसर्गित जनावारांची संख्या वाढत असतांना शहरातील भटक्या गायीस लम्पी सदृश्य गाठी असल्याचे निदर्शनास आले. गायीचा शोध पशुवैद्यकीय अधिकारी व पालिका प्रशासन घेत आहे. मात्र या गायी भटकत असल्याने उपचार करण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या शहरात २०० हून अधिक भटक्या गायी कळपाने फिरत आहेत. दरम्यान, अनेक वर्षापासून भटक्या गायींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात मोकाट फिरणाऱ्‍या गायीला लम्पीसदृश लक्षणे दिसत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून अन्य गायींना लक्षणे आहेत का याचा शोध घेत आहे. शहरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात केवळ दोन डॉक्टर आहेत. शहरासोबत परिसरातील ग्रामीण भागामधील जनावारांवर उपचार करावा लागत आल्याने त्यांना कामाचा अतिरेक तान सहन करावा लागत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्‍या गायीस लम्पीसदृश लक्षणे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे.
---------

लम्पी रोगाचा संसर्ग गायींना झाल्याचे निदर्शनास आले आहे. लम्पीच्या भीतीने नागरिक अंडी, दूध, चिकन खाण्यावर निर्बंध घालत आहेत. मात्र लम्पी हा जनावरांचा त्वचा रोग आहे. अंडी, दूध, चिकन खाण्याने मनुष्यास होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये.
-सत्यदीप चिकबिरे, पशु वैद्यकीय अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02839 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..