माथाडी, हमालांचे कामबंद आंदोलन सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडी, हमालांचे कामबंद आंदोलन सुरु
माथाडी, हमालांचे कामबंद आंदोलन सुरु

माथाडी, हमालांचे कामबंद आंदोलन सुरु

sakal_logo
By

माथाडी, हमालांचे
कामबंद आंदोलन सुरू
इचलकरंजी, ता. १९ ः कापड गाठीचे वजन ५० किलो करावे या हमाल संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने इचलकरंजी माथाडी आणि टेम्पो हमाल वजनवाढ विरोधी कृती समितीने सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले.
वस्त्रनगरीमध्ये सूताची बाचकी, कापडाच्या गाठी दररोज मोठ्या प्रमाणात येत जात असतात. या गाठी भरण्याचे काम हमाल, माथाडी कामगार करतात. शासनाने गाठीचे वजन ५० किलो निर्धारित केले आहे. मात्र त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. सध्या १०० ते ११० किलोचे बाचके अथवा कापड गाठ असल्याने हमाल व माथाडी कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वजनासंदर्भात तक्रार केल्यास काम जाण्याची भीती दाखवली जात आहे. कापड गाठीचे वजन ५० किलोचेच मर्यादित असावे, अशी मागणी हमाल व माथाडी कामगारांकडून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. ५० किलोवरील गाठी स्वीकारू नयेत अन्यथा कापड गाठी उचलणार नाही, असा इशारा माथाडी आणि टेम्पो हमाल वजनवाढ विरोधी कृती समितीकडून दिला होता. त्यासंदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने सोमवारी सकाळी येथील थोरात चौक येथे हमाल माथाडी कामगारांचा मेळावा झाला. त्यामध्ये धोंडिराम जावळे, शामराव कुलकर्णी, बाळासाहेब लाखे, विशाल लाखे, शांताराम लाखे, अब्राहम भोसले, इसाक आवळे, सचिन जाधव, अर्जुन देसाई उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02840 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..